सलमानने बिपाशाला दिले गिफ्ट

बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसवर त्याच्या कुटुंबियांच्या आणि चित्रपटसृष्टीतील काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत ५१ वा वाढदिवस साजरा केला.यावेळी सलमानने बिपाशाला ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डचा नेकलेस गिफ्ट दिला. बर्थडे बॉयने दिलेल्या गिफ्टबद्दल बिपाशाने त्याचे आभार मानले आहेत.बिपाशा बासूने इन्स्टांग्राम अकांऊटवरुन सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला असून सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सलमानने दिलेला ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डचा नेकलेस दाखविताना दिसत आहे. सलमानने पार्टीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांना ‘बिइंग ह्युमन’ ब्रॅण्डची ज्वेलरी भेट दिली आहे.
सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘बिइंग ह्युमन’ या त्याच्या ब्रॅण्डतर्फे फॅशन ज्वेलरीचे अनावरण करण्यात येणार आहे.