कोरोनाच्या सावटाखाली तुळजाभवानीच्या मंदिरात ‘असा’ झाला गुढीपाडवा सण साजरा

तुळजापूर : आज गुढीपाडवा. जगभरात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अनेक मंदिरे यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत गुढीपाडवा सण पारंपारिक पध्दतीने कोरोना सावटा खाली संपन्न झाला.

गुढीपाडव्या निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदीरातील   मुख्य गर्मगृहातील शिखरावर पहाटे  श्री तुळजाभवानी मातेचे मंहत श्री तुकोजी बुवा व  मंहत वाकोजी बुवा यांच्या हस्ते पुजन करुन गुढी उभारण्यात आली. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले मंदीराचे सेवेकरी छञे कर्मचारी संकेत वाघे रवि गायकवाड पुजारी गोंविद लोंढे उपस्थितीत होते.

 गुढी पाडव्या पार्श्वभूमीवर आज श्रीतुळजाभवानी मातेस संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले  होते.आज गुढी पाडव्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस आज संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते तसेच राञी देवीचा छबिना काढण्यात आला पण या सर्व धार्मिक विधी भाविकांविना पार पडल्या. श्रीतुळजाभवानी मंदीरात आजपर्यतच्या इतिहासात प्रथमच  गुढी पाडवा सण भाविकाविना साजरा केला गेला.

दरम्यान, तुळजापूर तालुक्यात 140 गाव 56तांडे असुन येथे कोरोनो चा फैलाव होवू नये यासाठी पोलिस,आरोग्यसह अन्य खात्याचे अधिकारी कर्मचारी सध्या वीसवीस तास काम करीत आहेत. पण काही अतिउत्साही मंडळी पोलिस गेली की  रस्त्यावर येत आहेत व गर्दी करीत आहेत. ग्रामीण भागात शहरी भागातीन मंडळी मोठ्या संखेने येत आहेत व काही मंडळी पारावर झाडाखाली बसुन पत्ते कुटत बसत आहे. आज पर्यत तालुक्यात परदेशी व  शहरी भागातील बाराशे  मंडळी आले आहेत.अजुनही राञी अपराञी ओघ सुरुच आहे.