केंद्राच्या कृषी विधेयकाच्या स्वगतासाठी रयत क्रांतीने उभारली थेट शेतात गुढी

farmar strike

मानोरा : केंद्र सरकारच्या बळीराजाच्या हिताचे असणार्‍या कृषी विधेयकाच्या सर्मथनार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबर चिखली ता.मानोरा येथील भूपेंद्र सरनाईक यांच्या शेतात गुढी उभी करून सर्मथन करण्यात आले. यावेळी हर्षद देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा आणला आहे, तो शेतकर्‍यांच्या हिताचा असून, त्यामुळे शेतकर्‍यांना स्वातंत्र्य मिळणार आहे.

शेतकर्‍यांना देशपातळीवर मार्केटिंग व्यवस्था उपलब्ध होणार आहे व मार्केट कमिटीच्या जाचातून मुक्त होणार आहे. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांची भीती नष्ट होणार आहे. तरी सर्वांनी या कायद्याचे स्वागत करावे हे आवाहन केले.

शरद जोशी यांच्या जवळचे व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले माजी मंत्री सदाभाऊ खोत जेव्हा राज्यमंत्री झाले. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फळे व भाजीपाला नियमन मुक्ती करून सदर शेतीमालाच्या स्वातंत्र्याचे पहिले दार खुले केले होते. आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे या तीन विधेयकातील शेतकरी हिताच्या विषयावरती वेळोवेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब यांनी पाठपुरावा केला होता.

या शेतकरी हिताच्या निर्णयाला कायद्याचे स्वरूप देऊन तीन विधेयके मंजूर केली त्याबद्दल रयत क्रांती संघटना गुढी उभारुन त्याचे स्वागत करत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षद देशमुख, मोहन आडे, गणेश चव्हाण, आनंद आडे शुभम देशमुख व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-