गुढीपाडवा : एकीकडे अवकाळी पाऊस दुसऱ्या बाजूला कोरोना सणांवर चिंतेचे सावट

अखिलेश कुलकर्णी : राज्यात १०७ कोरोना रुग्ण व देशात ४५० हुन अधिक रुग्ण सापडल्यामुळे वेळीच अटकाव घालण्यासाठी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. कोरोना वाढीची साखळी तोडण्यासाठी लोकांनी घरी राहुन सरकारच्या उपाययोजनांना प्रतिसाद द्यावे असे आवाहन करण्यात आले.

परंतु महाराष्ट्रात जिथे रुग्णांची संख्या जास्त दिसून आले त्या पुण्यात- पिंपरी चिंचवड मध्ये गेले काही दिवस दिलासा दायक अहवाल येत होते, पोजीटीव्ह रुग्णांची संख्या अगदी कमी होत असतानाच, पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागात पुन्हा भीतीचे वातावरण पसरत असल्याचे दिसून येत आहे.

याला कारण म्हणजे अवकाळी पावसाची दोन्ही शहराच्या बऱ्याच भागात लागत असलेली हजेरी व ढगाळ, दमट वातावरण. गेल्या काही दिवसात उन्हाने लाही लाही होत होती परंतु जंतु संसर्ग कमी होण्यासाठी उन्हाची मदत होत असल्याचे बऱ्याच जणांचे मत होते त्यामुळे हा कडक उन्हाळा देखील सहन करायची शहरवासीयांनी तयारी दाखवली असतानाच पावसाची हजेरी हि चिंतेची बाब मानली जात आहे.

दोन्ही शहरात नेहमीप्रमाणे उत्साहात गुढीपाडवा साजरा होत नसला तरी कुटुंबीयांच्या सानिध्यात वेळ घालवून कुटुंबातील नाती घट्ट होत असताना दिसत आहे याचेच अनेक सोशल मीडिया मार्फत देखील अनुभव येत आहेत. वाहन, सोने खरेदी साठी उत्तम मानला जाणारा हा मुहूर्त कोरोना मुळे चुकला असून व्यापारी लोक देखील काळजीत आहेत. तसेच हिंदुनववर्षाची सुरुवात आजपासुन होत असून आता कोरोनाचे सावट दुर व्हावे अशीच प्रतिक्रिया प्रत्येक नागरिक देत आहे.

दरम्यान राज्यातील सर्वच नागरिकांनी योग्य ती काळजी, सुरक्षितता बाळगुन घरीच राहावे असे आवाहन आम्ही टीम महाराष्ट्र देशा मार्फत सर्व नागरिकांना करत आहोत.