औरंगाबाद : पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी चार महिन्यांपूर्वी जायकवाडीतून २० एमएलडी पाणीपुरवठा वाढवून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. याबाबत नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र मनपा प्रशासनाने या आदेशाला केराची टोपी दाखविली. सोमवारी पालकमंत्री शहरात असताना पाणीप्रश्नावरून सिडको-हडकोत पाण्यावरून रणकंदन पेटले होते.
सिडको-हडकोच्या अयोध्यानगरसह काही वसाहतींना सोमवारी पाणीपुरवठा होणार होता, मात्र नळांना आली पाणी आलेच नाही. तर काही भागांत कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे नागरिकांनी एन-७ येथील महानगरपालिका झोन कार्यालयात धडक दिली. दुसरीकडे नजीकच्या कॉलनीतीलही नागरिक पोहचले. परस्परांवर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मात्र या नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा का होत नाही, असा जाब चचारत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अयोध्यानगरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी मनपा आयुक्त व झोन ३, ४ व ५ च्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हे सोमवारी शहरात होते.
शहरातील पाण्याच्या टंचाईबाबत तसेच दोन दिवसांआड पाणीपुरवठा व जायकवाडीतून २० एमएलडी पाणी शहरात आणण्याबाबतचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. तसेच तशा प्रकारचे नियाजन करून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. या घोषणेबाबत पालकमंत्री देसाई म्हणाले की, शहरात पाणी साठा करण्यासाठी टाक्या कमी पडतात. तसेच शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्या बदलणे आवश्यक आहे. त्यानंतरच दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे जिल्हा बँकेवर सलग आठव्या वर्षीही अजित पवारांचेच वर्चस्व
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण
- “भविष्यात भाजप शिवसेनेसोबत…”; खोतकरांच्या बॅनरबाजीवर प्रवीण दरेकरांचे मोठे विधान
- ‘बड़े अच्छे..’ फेम नकुलच्या चिमुकल्यास कोरोनाची लागण
- महत्वाची बातमी! कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोनाबाधित
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<