वस्तू व सेवा करात वाढ होणार ? सामन्यांच्या खिशाला बसणार कात्री

टीम महाराष्ट्र देशा : वस्तू व सेवा (GST) कराबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार आहे. देशाच्या महसूल खात्यात रक्कम घटल्याने करांमधून ही घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार GSTच्या स्लॅब मध्ये बदल करणार आहेत. सध्याच्या 5 टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब वाढून ९ ते १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. तर 12 टक्क्यांचा स्लॅब बंद करून थेट 18 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

GST प्रणाली लागू होऊन तब्बल अडीच वर्ष झाली. यादरम्यान केंद्र सरकानं जीएसटीच्या स्लॅबमध्ये अनेक बदल केले. त्यावर आता पुन्हा बदल करण्यात येणार आहेत. GST स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारी तिजोरीत 1 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ होणार आहे. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

Loading...

दरम्यान GST लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील करात कपात करण्यात आली होती. ज्यामुळे 14.4 टक्क्यांवरून कराचा दर कमी होऊन तो 11.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठीच केंद्र सरकार GST स्लॅबमध्ये बदल करणार आहे. तसेच महागड्या रूग्णालयांमधील उपचारांपासून हॉटेलमधील प्रति दिवस १ हजार रूपयांपेक्षा कमी दराच्या बिलांवर कर द्यावा लागत नाही. परंतु यांनादेखील GST अंतर्गत आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातल्या आर्थिक मंदीच्या काळात पुन्हा GSTच्या वाढीची झळ सोसावी लागत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार