fbpx

इलेक्ट्रीकल वाहनांवरचा वस्तु आणि सेवा कर १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा- वस्तू आणि सेवा कर परिषदेनं इलेक्ट्रीकल वाहनांवरील कर १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच इलेक्ट्रीकल वाहनांच्या चार्जरवरील करदेखील १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

स्थानिक प्रशासनानं इलेक्ट्रीकल वाहने भाडे तत्वावर घेतल्यास त्यांनाही या करातून सवलत देण्यात आली आहे. वस्तु आणि सेवा कर कपातीचे फायदे ग्राहकांना न देणाऱ्या संस्थांवर दहा टक्के दंड ठोठावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.