मोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही’

blank

टीम महाराष्ट्र देशा – रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीला डोळ्यासमोर ठेवून रविवारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी राख्या आणि गणेशमुर्तीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) काढून टाकला आहे. त्यामुळे आता राख्या आणि गणेश मुर्तीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आल्यानं लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रक्षा बंधन आणि गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. त्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा. त्यामुळे राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्यात येत असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

चारित्र्याच्या संशय; पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या