पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही – अढिया 

नवी दिल्ली : सिलेंडर आणि विमानाच्या इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणता येईल पण पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही असं स्पष्टीकरण अर्थ सचिव  हसमुख अढिया यांनी दिलं. तसंच 28 टक्के लागू असलेल्या वस्तूंवर कर कमी करता येऊ शकतात असंही ते म्हणाले आहेत.

वस्तू सेवा कर जीएसटी लागू होण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अडिया म्हणाले की, २८ टक्के स्लॅबमधून वस्तू हटवणे हे आता व्यावसायिक वाटत आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदलण्याआधी महसूलाचा विचार केला पाहिजे.

जीएसटी रिटर्नचे नवे फाॅर्म जानेवारीपासून उपलब्ध होती. तसंच जीएसटीचं पालण होतं की नाही यासाठी कठोर कायद्याची गरज नाही तर मिळणारा डेटा हाच कायदा असणार आहे. त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महागाई कमी करण्यासाठी २८ टक्क्यांची कररचना संपुष्टात आणावी – सुब्रमण्यम