fbpx

एकाच वेळी दोन मुलीशी लग्न; हे आहे व्हायरल पत्रिकेचे सत्य

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशा व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडियोमुळे अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. तर कधी अनेकांना मदत देखील झाली आहे. मागील काही दिवसांपासून अशीच एक लग्न

पत्रिका सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली. ज्यामध्ये एक वर आणि दोन वधू होत्या.
आता हि पत्रिका व्हायरल झाल्यावर ‘आम्ही लग्नाळू’ म्हणणाऱ्या मुलांनी वराला शिव्याश्राप देत पत्रिका व्हायरल केली. लग्न झाल्यावर दुसरे लग्न करणे आपल्याकडे नवीन नाही. मात्र, एकाच लग्नात दोन सख्या बहिणींशी लग्न म्हणल्यावर अनेकांनी हि पत्रिका फेक असल्याचा अंदाज देखील वर्तवला. पण आता या व्हायरल पत्रिकेचे सत्य समोर आले, जे प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे.

हि पत्रका नांदेड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बिलोली तालुक्यातील कोट्यगाळ येथील गंगाधर शिरगीरे यांच्या मुंलींची आहे. शिरगीरे यांना एकूण चार मुली असून सर्वात मोठी मुलगी धूरपताबाई हि अंशत मतीमंद आहे, त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या मुलींचे लग्न आधीच झाले. धूरपताबाई हि अंशत मतीमंद असल्याने तिच्या लग्नाचा मोठा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता. याच दरम्यान लहान मुलगी राजश्रीच्या लग्नाची बोलणी सुरु झाली होती. दरम्यान, राजश्रीने ‘जो कोणी माझ्या मोठ्या बहिणीचा स्वीकार करेल’ त्याच्याशीच लग्न करण्याची भूमिका घेतली. राजश्रीच्या या निर्धारावर समराळा,तालुका धर्माबाद येथील साईनाथ उरेकर या युवकाने तयारी दर्शवत लग्नाला होकार दिला. दोन्ही कुटुंबाच्या होकाराने हे लग्न २ मे रोजी आनंदात पार पडले आहे. एका गरीब कुटुंबातील मुलीने आपल्या बहिणीसाठी दाखवलेले हे मोठेपण खरच कौतुकास्पद आहे.