मुंबई: आज (२६ जून) शाहू महाराजांची जयंती (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) असून या निमित्तानेच संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी ट्वीट करत अभिवादन केले आहे. “गजांत लक्ष्मी पायांत लोळण घेत असता हिंदुस्थानातील इतर संस्थानिकांप्रमाणे राजैश्वराचा उपभोग घेत ख्यालीखुशालीचे जीवन न कंठता कोल्हापुरचा एक शाहु राजा दिनदलितांच्या वस्तीत रयतेच्या झोपडीत गेला आणि त्याने त्यांच्या उद्धाराचा वसा घेतला. राजदंड ही शोभेची वस्तू नसून लोकसेवेचे एक साधन आहे याची पुर्णपणे जाणीव असलेला हा एक अलौकीक राजा होता.”, असे ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केले आहे.
लोकांवर प्रेम करणारा , प्रजेवर माया करणारा ,प्रचंड देहाचा आणि मोठ्या मनाचा , गरिबांवर प्रेम करणारा , जातपात न मानणारा ,उद्योगांना चालना देणारा , कुस्तीची आवड असणारा , कलेला आश्रय देणारा, शिक्षणाचा पुरस्कार करणारा. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.
राजदंड हि शोभेची वस्तु नसुन लोकसेवेचे एक साधन आहे याची पुर्णपणे जाणीव असलेला हा एक अलौकीक राजा होता , लोकांवर प्रेम करणारा , प्रजेवर माया करणारा ,प्रचंड देहाचा आणि मोठ्या मनाचा , गरिबांवर प्रेम करणारा , जातपात न मानणारा ,उद्योगांना चालना देणारा , कुस्तीची आवड असणारा ,…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 26, 2022
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली.
महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’. अशा थोर लोकराजा जयंतीनिमित्त अभिवादन….मानाचा मुजरा. असे ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chitra Wagh : “…आता रश्मी वहिनींच्या पडद्यामागून लढाई करणार”, चित्रा वाघ यांचा टोला
- Chitra Wagh : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे…”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया
- Shrikant Shinde : शिवसैनिक आक्रमक! खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<