हरित शिवरस्ते! ‘या’ तालुक्यात होणार अभियान, अभिनेता सयाजी शिंदे राहणार उपस्थित

लातूर : जिल्ह्यातील सुरू असलेल्या शेतरस्ते कामाला चळवळीच्या स्वरूपात उभी राहात असताना आता त्याचा दुसरा टप्पा म्हणून हरित शिवरस्ते या अभियानाला सुरुवात होणार आहे. हे अभियान औसा तालुक्यात होणार आहे. या अनुषंगाने अभियानाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी अभिनेता सयाजी शिंदे यांची भेट घेवून या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली आहे. या विनंतीवरून अभिनेता सयाजी शिंदे यांनी सहमती दर्शवली आहे.

प्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराई, महाराष्ट्रचे प्रमुख सयाजी शिंदे यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी दि. ३ एप्रिल रोजी मुंबई येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान औसा विधानसभा मतदारसंघातील सुुरू असलेेल्या शेतरस्ते अभियानाबाबत अभिनेता सयाजी शिंदे यांना माहिती देेत पर्यावरण संवर्धनासाठी व भविष्यात अतिक्रमण टाळण्यासाठी जून महिन्यात मतदारसंघातील शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा मानस व्यक्त करुन या चळवळीशी जोडले जाण्याची विनंती आ. पवार यांनी अभिनेता शिंदे यांना केली.

एकंदरीत झालेल्या या चर्चेनंतर जून महिन्यातील नियोजित ‘हरित शिवरस्ते’ अभियानात सहभागी होण्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी सहमती दर्शविली आहे. या चर्चा दरम्यान लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याशी अभिनेता सयाजी शिंदे यांची फोनवरून याबाबत चर्चाही झाली.संपूर्ण राज्यात औसा शेतरस्ते पॅटर्नची चर्चा सुरू असताना यामध्ये आ. अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून अनेक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या