Nashik- नाशिककरांच्या ग्रीन रिवोल्युशन अंतर्गत वृक्षारोपण

नाशिक : लोकसहभागातून ​नाशिक शहरालगत वनीकरण करून आनंदवन निर्माण करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या नाशिक ग्रीन रिवोल्युशन येत्या रविवारी (दि. २ जुलै) सकाळी ७ वाजेपासून ‘आनंदवन २०१७’ वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबक रोड वरील वासाळी फाटा येथील खादी ग्रामोद्योग विभागाच्या जागेत केंद्र सरकारच्या परवानगीने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. नाशिककरांना या मोहिमेत सहभागी होण्याची संधी असून प्रत्येकाने काही वृक्ष रोपण करून ती दत्तक घ्यायची आहेत. नाशिक ग्रीन रिवोल्युशनसोबत काम करून ही झाडे मोठी होई पर्यंत काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावयाची आहे.

रविवारी होणाऱ्या मोहिमेसाठी नाशिक ग्रीन रिवोल्युशन संस्थेकडून सुमारे ५००० खड्डे खोदण्यात आली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांच्या या टीमने मे महिन्यात हे खड्डे खोदण्यात आले आहेत. आता ही टीम १५० ते २०० लोकांपर्यंत वाढली आहे. या सर्वांनी टिकाव व पावडे हातात घेऊन झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले आहेत.

लोकसहभागातून वनीकरण, राखु पर्यावरणाचे संतुलन, सुधारू मानवी जीवन​ हे ब्रीद सोबत घेऊन दीड वर्षांपूर्वी नाशिक ग्रीन रिवोल्युशन ही चळवळ उभी राहिली आहे. डॉक्टर शिक्षक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते असे विविध क्षेत्रातील २० ते ३० पर्यावरप्रेमी नागरिक सोबत येऊन गेल्यावर्षी २०१६ मध्ये १ जुलै रोजी वनविभागाकडून टेकडी दत्तक घेत तब्बल ५५०० खड्डे चुंचाळे व २२०० तवली फाटा येथे श्रमदानातुन ७०००- ८००० वृक्षारोपण झाले व संगोपनासाठी सतत अविरत वर्षभर २० ते ३० लोकांनी नेटाने परिश्रम घेवुन त्या रोपांची काळजी घेतली. आठवड्यातुन २ तास श्रमदान देवून एका वर्षात ७००० वृक्षलागवड व संगोपण करण्यात यश मिळवले आहे. पुढील तीन वर्षे या झाडांची काळजी घेण्यात येणार असून त्याती ९० टक्के झाडे आज मोठी झाली आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन काम करणे आवश्यक असून सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्गसंवर्धनाप्रती बांधिलकी जपण्याचे आव्हान ग्रीन रिवोलुशन तर्फे करण्यात आले आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ९८६०२३९९३१, ९८२२८१२९६९, ९४२२७४६१६४, ९६७३२६१००९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे : https://www.facebook.com/greenrevolutionnashik या फेसबुक पेजवरूनही ग्रीन रिवोलुशनशी जोडले जाऊ शकता.

​”​जर ग्रीन रिवोलुशनचे २० ते ३० लोक एकत्र येवुन व आठवड्यातुन २ तास श्रमदान देवून एका वर्षात ७००० वृक्षलागवड व संगोपण करू शकतात तर नाशिक शहराच्या फक्त ५% लोकांनी (२ लाख) आठवड्यातुन २ तास जरी वृक्षारोपण व संवर्धात योगदान दिले तर संपूर्ण नाशिक जिल्हा हिरवाईने नटुन संपन्न होऊ शकतो आणि पर्यावरणाच्या दुष्परिणामावर मात होऊ शकते. नाशिकचे थंड हवेचे ठिकाण ही ओळख जपण्यासाठी नाशिककरांनी या मोहिमेसाठी एकत्र येणे महत्वाचे आहे.​”​ – डॉ. संदीप अहिरे.