MPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; नियुक्तीची फाईल राज्यपालांकडून मंजूर

mpsc bhagat singh koshyari

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय चर्चेत आहे. राज्य सरकारने एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय अंतिम निर्णयासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती.

दरम्यान आता मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे आता एमपीएससीच्या रखडलेल्या मुलाखती होऊन अनेकां दिलासा मिळणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला.

या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होते. त्यामुळे एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. याच मुद्द्याला धरून विरोधकांनी देखील राज्य सरकारला चांगलेच घेरले होते.

दरम्यान आजच ठाकरे सरकारमधील सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. एमपीएसी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली होती.

महत्त्वाच्या बातम्या