मुंबई: बीड तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस गाळपास जात नसल्याने एक शेतकरी नैराश्यात होता. त्यामुळे त्याने राहिलेल्या उसाला आग लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यामुळे शेतकरी संघटनांचे नेते आणि ऊस उत्पादक शेतकरीही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव (32) या युवक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांचे नेतेही राज्य सरकारविरोधी आक्रमक झाल्याचं दिसून आले, यानंतर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता, संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठकीत दिले.
#ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठकीत दिले. १ मेनंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू. प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. pic.twitter.com/UnWyUuoVMS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 17, 2022
शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून, रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे देखील उपस्थितीत होते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या –