चेन्नईमध्ये अडकून पडलेला मायकल हसीला मोठा दिलासा ; रविवारी मायदेशी जाण्याची संधी

मायकल हसी

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान अनेक संघाच्या विविध खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

स्पर्धा रद्द झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना कोरोनाची लागण झाली होती. चेन्नई येथे योग्य उपचारानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर ते काही दिवस विलगीकरणात होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांचा भारतातील मुक्काम पुन्हा काही दिवसासाठी वाढला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमध्ये अडकून पडलेला मायकल हसीला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. हसीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याला मालदीवमध्ये विलगीकरणात राहावं लागत होतं. पण आता निगेटिव्ह चाचणी आल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियात परतता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP