नवी दिल्ली : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील शेतीलाही याचा फटका बसला आहे. शेतात पुराचे पाणी घुसल्यामुळे प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने जवळपास ७०० कोटी मंजूर केल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.
गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. ‘आम्हाला नुकत्याच आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटीं रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे,’ असे तोमर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं – फडणवीस
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द