शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन

नवी दिल्ली : शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकातून आलेल्या 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं आहे. खरीप हंगामातील पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (किमान आधारभूत किंमत) देण्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी यावेळी केली. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली जाईल, असं मोदींनी म्हंटले आहे.

याशिवाय 2018-19 च्या ऊसाचा एफआरपीही येत्या दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव असेल, असंही मोदी म्हणाले.उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. त्यासाठीच सरकार प्रयत्न करत असल्याचं मोदींनी नमूद केलं. गेल्या सात ते 10 दिवसात शेतकऱ्यांना 4 हजार कोटींची मदत दिल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी देशभरात विविध आंदोलनंही झाली. महत्त्वाचं म्हणजे स्वामीनाथन आयोगाने
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ज्या शिफारसी केल्या आहेत, त्यापैकी महत्त्वाची शिफारसही दीडपट हमीभावाची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर

IMP