शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळणार !

मुंबई : नैसर्गिक संकट, कीड यामुळे काबाड कष्ट करून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत बाद होतं. यामुळे पुन्हा उभारी घेण्यासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जाचा मार्ग निवडावा लागतो. यासाठी देखील अनेक अडचणी येतात. गेल्या काही वर्षांमध्ये सावकारीचा प्रकार कमी झाला असला तरी शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची भर पडत आहे.

२०२० मध्ये आलेल्या कोरोना रोगामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा गडगडला. यावर्षी चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र, यावर्षी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला. यामुळे पिकवलेला शेतमाल बाजारात विकायला नेणं देखील परवडत नसल्याने शेतात ट्रॅक्टर फिरवून किंवा जनावरांना खायला घालून त्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता राज्य सरकारने काहीसा दिलासा दिला आहे.

आधी कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजा दराने कर्ज मिळत होतं. मात्र, आता ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळणार आहे. आज (१० जून) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

‘नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज ० टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बिनव्याजी पीक कर्जाची ही सवलत पूर्वी केवळ १ लाख रूपयांपर्यंत होती. या निर्णयाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल,’ असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP