औरंगाबाद: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपामुळे मरगळ आलेल्या लालपरीने गती पकडली आहे. आज १०३ बसेस धावल्या तर ३०८ फेऱ्यांद्वारे ५३९१ प्रवाशांनी प्रवास केला. पुणे मार्गावर १५ तर नाशिक मार्गावर ७ शिवशाही बस धावल्या. आता ५ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत ८०० कर्मचारी रुजू झाले असून इतर सर्व कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत अजूनही आपल्या दुखवट्यावर ठाम आहेत.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात कर्मचारी ७ नोव्हेंबर पासून संपावर गेले होते. ८ ते १० दिवसात हा संप मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आज जवळपास दीड महिन्यानंतरही हा संप पूर्णपणे मिटलेला नाही. राज्य शासनाने कर्मचारी रुजू व्हावे यासाठी पगारवाढ, सेवा समाप्ती, निलंबन यांसह अनेक हत्यार उपसले. मात्र कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला नाही.
त्यामुळे आत्तापर्यंत मोजकेच कर्मचारी रुजू झाले आहेत. डिसेंबर महिन्यात ५० ते ७० एसटी धावत असून जवळपास ४ ते ५ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत. मात्र अजूनपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आलेल्या नाही. जिल्ह्यातील सिल्लोड, जालना, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड, बीड, गेवराई याठिकाणी एसटीच्या दररोज फेऱ्या होत आहेत.
नवीन वर्षी अजिंठा पर्यटकांनी फुलले
शनिवारी (दि.१) विविध मार्गावर औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून, १०३ बस धावल्या. आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर १२ बसेसच्या २४ फेऱ्या करण्यात आल्या. यात ४४४ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद बीड मार्गावर १३ बसच्या २६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ८ बसने ३० फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर ७ बसने २६ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ७ शिवशाही बसच्या १४ फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १५ शिवशाही बसच्या १५ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर ६ बसने २० फेऱ्या करण्यात आल्या. शनिवारी एकूण १०३ बसच्या ३०८ फेऱ्या झाल्या. तर यातून ५३९१ प्रवाशांनी प्रवास केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<