‘आजी, माजी आणि भावी सहकारी’ मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधान

uddhav thakre

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे.

‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अब्दुल सत्तर यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका जोर कुणाकडे होता. यावरून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी आज अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या