fbpx

हे उपकार शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ; भुजबळांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत

टीम महाराष्ट्र देशा : आमच्यावर अन्याय झालेला असताना कारागृहातून सुटण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस, समता परिषद यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेने केलेले आंदोलने , मोचॅ काढल्याने आम्ही भुजबळ कुटुंबीय हे उपकार शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. असे भावोद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काढले आहेत. तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर छगन भुजबळ नाशिक मध्ये आले आहेत यावेळी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आल आहे.

लॅड्रींग प्रकरणात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची अडीच वर्षानंतर जामीनावर सुटका झाली. या नंतर काल छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आले त्या वेळी पाथर्डी फाटा येथे फटाकयांची आतषबाजी, ढोल तांशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘‘आम्ही कारागृहात असताना आमची सुटका व्हावी यासाठी नाशकात निघालेला लाखोंचा मोर्चा मी विसरणार नाही. आम्ही विकासकामे केली, मध्यतरांच्या काळात अडथळे आले, काही अपूर्ण राहीले, अश्या प्रकारची विकास कामे आगामी काळात पूर्ण करणार आहे. तसेच भविष्यकाळात पुढील वाटचालीसाठी तुमच्या शक्तीचे बल भुजबळ कुटुंबींयाना मिळेल. अस छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment