लाच घेणारी ग्रामसेविका गुन्हा दाखल होताच फरार

bribe

बीड : खरेदी केलेल्या जागेचा फेर नोंद करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ग्रामसेविके विरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर ग्रामसेविका गुन्हा दाखल झाल्याचे समजताच फरार झाली.

गेवराई तालुक्यातील रानमळा या गावी ज्योत्स्ना हनुमंत गाडे ही महिला ग्रामसेवक म्हणून काम करते तिने एका व्यक्‍तीस खरेदी केलेल्या जागेची फेरनोंदणी करण्यासाठी पाच हजार लाच मागीतली सदर व्यक्‍तीने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती.

त्यावरून गेवराई पोलिस ठाण्यात तिच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती फरार झाली.