औरंगाबाद : गट विकास अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तीन दिवसांपूर्वी ग्रामसेवक संजय शिंदे यांनी विष प्राशन केले होते. त्यांचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद महसूल प्रबोधनी सभागृहात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले.
तब्बल दहा महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा आज महसूल प्रबोधनीच्या सभागृहात पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान बिडकीनचे ग्रामसेवक संजय शिंदे यांना गटविकास अधिकारी लोंढे यांनी मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे शिंदे यांनी विष प्राशन केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, मधुकरराव वालतुरे, रमेश पवार यांच्यासह सर्वच सदस्य आक्रमक झाले होते.
पैठण तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दरमहा पैशांची मागणी करीत असलेले पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे ग्रामसेवकांना दरमहा मिळत असलेल्या पगारातून व वित्त आयोगातील काढण्यात आलेल्या धनादेशातून पैशांची मागणी करतात असा आरोप करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- क्रांती चौकाला मिळणार नवा आणि आकर्षक लूक
- औरंगाबादमध्ये सफाई कामगारांच्या थकीत वेतनावरून युवक काँग्रेसचा राडा, बीव्हीजी कार्यालयात तोडफोड
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- संमेलनाध्यक्षापदासाठी मसापकडून भारत सासणे यांचे नाव
- सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती