fbpx

जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरुच

पुणे : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणतेही रिपार्ट आणि माहिती न पाठविण्याचा निर्णय ग्रामसेवकांच्या संघटनेने घेतला आहे. बुधवारपासून या असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्यावतीने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्याभरातील १ हजार १६३ ग्रामसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे.

ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती देण्यासाठी तसेच पदोन्नतीस दिरंगाई केल्यामुळे संबधित सेवकास जबाबदार धरण्यात येऊन त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. १ नोव्हेंबर २०१५ नंतर सेवेत रूजू झालेल्या ग्रामसेवकांच्या कपात केलेल्या १० टक्के रकमा डीसीपीएसमध्ये जमा करण्यात आल्या नाही. सहाव्या वेतन आयोगातील फरक रकमा जमा करण्यात याव्यात. ग्रामसेवकांचे पगार दर महिन्याच्या ५ तारखेला करण्यात यावेत.

आदिवासी भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांस एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा आणि प्रोत्साहन भत्ता लाभाची अद्यापपर्यंत अमंलबजावणी झाली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ महिन्यापेक्षा अधिक कालावधी निलंबित झालेल्या ग्रामसेवकास पुनर्स्थापित करण्यासाठी न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल संबधित अधिकारी आणि सेवकांवर जबाबदारी निश्‍चीत करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

मागील दोन वर्षांत ग्रामसेवक संवर्गाचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गाच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिंक नुकसानीस जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटेने केली आहे

2 Comments

Click here to post a comment