ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे बेमुदत आमरण उपोषण

जालना -मागील २ वर्षा पासून शासनाने दिलेले आश्वासन न पाळता उलट संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे ,क्लस्टर मुळे अनके ऑपरेटर ला नियुक्ती मिळाली नाही गेल्या वर्षी चे जानेवारी २०१६ ते डिसेम्बर २०१६ पर्यंतचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून दिले नाही ,मार्च २०१७ पर्यंतचे १५०० ऑपरेटर चे मानधन मिळाले नाही .आणि वरून टास्क कन्फर्मेशन च्या नावाखाली संगणक परिचालकांची आर्थिक पिळवनुक मोठ्या प्रमाणात होत आहे ,संगणक परिचालकांना उपाशी ठेऊन डिजिटल महाराष्ट्र कसा होईल  शक्य आहे.असा प्रश्न विचारत संगणक परिचालक

शासनाने सर्व ऑपरेटर ला कामावर घेणे ,टास्क कन्फर्मेशन रद्द करून ६००० निश्चित मानधन एका तारखेला देणे यासह ई-ग्राम सोफ्टवेर मध्ये बदल करणे आणि सर्वच मागण्या मान्य करणे यासाठी २५ सप्टेंबर २०१७ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे परंतु शासनाने अद्याप पर्यंत कुठलीच दखल न घेतल्यामुळे जागे केल्या शिवाय संगणक परिचालकांना न्याय मिळणार नाही . काल दिनांक 12 ऑक्टोबर पासून संगणक परिचालक आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत

पूर्ण राज्यात, कोणी तालुक्याच्या ठिकाणी तर कोणी जिल्हा परिषदे समोर  उपोषणास बसले आहेत.जालना जिल्हा परिषदे समोर आठ तालुक्याचे एकत्रित आमरण उपोषण कालपासून सुरु आहे. जिल्हा ग्रामसेवक संघटनेने काल एक पत्र देऊन पाठिंबा दिला आहे

 

You might also like
Comments
Loading...