अहमदनगर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणार निवडणुक

गुरुवारपासून लागू होणार आचारसंहिता

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीच्या ११२ जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे. त्यामुळे गावपातळीवर प्रचारासाठी सुरवात झाली आहे. २५ फेब्रुवारीला निवडणूक होत असून गुरुवार (दि.२५)  पासून गावात आचारसंहिता लागू होणार आहे.

१६ ग्रामपंचायती मध्ये  ११२ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मार्च ते मे २०१८, दरम्यान मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची माहिती निवडणूक शाखेकडून  मागितली होती. त्या नुसार ही निवडणूक जाहिर झाली आहे. गेल्या चार महिन्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा हा तिसरा टप्पा आहे.

कोणत्या गावात होणार निवडणुका ?

संगमनेर-पिंपळगाव, कोंझिरा,श्रीरामपूर- भैरवनाथ नगर, दत्तनगर नगर-हिंगणगाव, कोपरगाव,पोहेगाव बुद्रुक, नेवासा,शहापूर,पाथर्डी, जवखेडे, खालसा राहता-कणकुरी, रुई, पुणतांबा राहुरी-शिलेगाव,शेवगाव-देवटाकली,एरंडगाव, समसूद, थाटे, वडुले खुर्द.

निवडणूक कार्यक्रम
◆निवडणूक नोटीस प्रसिद्ध – २५ जानेवारी

◆अर्ज विक्री व दाखल दिनांक- ५ ते १० फेब्रुवारी

◆अर्जाची छाननी- १२ फेब्रुवारी

◆अर्ज माघारी घेणे- १५ फेब्रुवारी (दुपारी तीन पर्यंत)

◆मतदान – २५ फेब्रुवारी

◆मतमोजणी – २६ फेब्रुवारी

You might also like
Comments
Loading...