ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रीय 

astik kumar pandey

अकोला प्रतिनिधी : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदु ठरलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मार्ग मोकळा करायचा असेल तर ग्रामपंचायती ताब्यात असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची फिल्डिंग लावून जास्तीत जास्त सरपंच व सदस्य विजयी करण्यासाठी भाजप तयारीत आहे. 

यावर्षी ग्रामपंचायत निवडणुक रंगतदार होणार असून या संदर्भात जिल्हाअधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भयपणे, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे यांनी निवडणुकीत पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या संदर्भात निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अर्धदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेबाबत विविध पैलू वर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यशाळेमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश पत्रकारांना वितरित करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असते. त्यामुळे तिन्ही संस्थेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय तयारीला सुरवात केली आहे. जिल्ह्यात एकूण २७२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. जिल्हा परिषदेवर सध्या भारिप – बमस ची सत्ता आहे. त्यामुळे गावपातळीवर मुळा घट्ट करून आणि मतदारांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषद काबीज करण्याचे भाजप चे विशेष प्रयत्न दिसत आहेत.