आता प्रतीक्षा निकालाची…

बीड जिल्ह्यात 72 टक्के मतदान

बीड:- जनतेतून प्रथमच सरपंच पदाची निवडणूक होत आसल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर व परभणी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासोबतच ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

बीड जिल्ह्यातील ६५३ ग्रामपंचायातींसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. बीड जिल्ह्यात 1987 सरपंच तर 12018 सदस्य पदाच्या उमेदवारांचे जीव आता टांगनीला अडकले आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. जिल्ह्यात 72 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यावर्षी पहिल्यांदा सरपंच जनतेतून निवडला जाणार आहे त्यामुळे वेगळच महत्व या निवडणुकीला आले आहे. या वेळी बीड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

You might also like
Comments
Loading...