ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांच्या जाचातून होणार मुक्तता

CM on irrigation Scam

टीम महाराष्ट्र देशा- कर्मचार्‍यांना वेतन अदा करताना होणारा ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबविण्याच्या दृष्टीने सरकारने महत्वाचं पाऊल उचललं आहे.राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने या कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ६ जानेवारीला घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करारनामा करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँकेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनप्रणाली विकसित करण्यात येणार असून,कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत कर्मचाऱ्यांची  सर्वंकष माहिती या वेतनप्रणालीवर भरून ही माहिती गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातील शासनाचा हिस्सा संबंधित ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर संगणकाद्वारे अंतिम करण्यात येणार आहे.

Loading...

महाराष्ट्रात जवळपास २७ हजार ७७५ ग्रामपंचायती असून, त्यात जवळपास १ लाखाच्या वर कर्मचारी काम करतात. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, या आदेशावर राज्य शासनाचे सचिव असीम गुप्ता यांची स्वाक्षरी आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार