उद्या गुलाल कोणाचा त्यावरच ठरणार पक्षांचे भवितव्य

ग्रामपंचायत निवडणुकीची उद्या मतमोजणी

श्याम पाटील,औरंगाबाद प्रतिनिधी:- थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया मराठवाडयात पहिल्यांदाच हाेणार असल्याने शनिवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नागरिकांमध्ये उत्कंठा पाहायला मिळाली. आपल्याच अधिकृत पॅनल चा सरपंच निवडून यावा यासाठी कार्यकर्त्यांनी अतोनात कष्ट घेतले आहेत . मराठवाड्यातील १८५४ ग्रा.पं.च्या यावेळी निवडणूका पार पडल्या असून उद्या मतमोजणी व निकाल आहे .या निवडणुकांच्या निकालावरून बहुतेक कोणत्या पक्षाला 2019 साठी तयारीला लागण्याची गरज आहे याचा अंदाज येणारअसल्याने या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रा.पं. पैकी १८ सरपंच आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर हिंगाेलीत ४९ पैकी २ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत.जालन्यात २२४ पैकी ८ ग्रा.पं. बिनविरोध झाल्यामुळे उर्वरितसाठी ग्रा.पं साठी
७४% मतदान झाले आहे परभणी जिल्ह्यात १२६ पैकी १३ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत . बीड जिल्ह्यात ६५५ ग्रा.प.साठी मतदान झाले असून, ४८ सरपंच बिनविरोध झाले. आणि एकही अर्ज न आल्याने सदस्यपदाच्या २७ जागा रिक्त राहणार आहेत. गुलाल आपलाच असा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दिसून येत असला तरी मराठवाड्यातील भाजपा आणि शिवसेना या दोन मुख्य पक्षांसाठी भवितव्य ठरवणारा असणार आहे त्यामुळे या निवडणुकात भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंगेस सारख्या पक्षांच्या नेत्यांनी विशेष लक्ष घातले होते

You might also like
Comments
Loading...