fbpx

ग्रा.पं. निवडणुकीत देवगडमध्ये शिवसेनेची मुसंडी

shivsena flag

टीम महाराष्ट्र देशा-  देवगडमध्ये बुधवारी ७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले. सात पैकी ३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला तर भाजपाला अवघ्या एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. फणसगावमध्ये गाव विकास पॅनेलला यश मिळाले तर स्वाभिमान पुरस्कृत समर्थ विकास पॅनेलने २ ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळविले आहे.बुधवारी देवगड मध्ये वळीवंडे, पावणाई, विठलादेवी, वानीवडे, फणसगाव, शिरवली, रामेश्वर या ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. वळीवंडे, पावणाई, विठलादेवी या ३ ग्रामपंचायतींवर बहुमताने शिवसेनेचा भगवा फडकला.

फणसगावात गाव विकास पॅनेल तर रामेश्वर आणि वानीवडे ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमान पुरस्कृत समर्थ विकास पॅनेलने बाजी मारली. शिरवली ग्रामपंचायतीमध्ये भाजपा पक्षाच्या भक्ती किशोर जठार यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आहे. वळीवंडे ग्रामपंचायतीत अर्चना अरविंद घाडी २४९, पावणाई ग्रामपंचायतीत गोविंद जयवंत घाडी ३३६, विठलादेवी ग्रामपंचायतीत दिनेश शांताराम नारकर २४१, वानीवडे ग्रामपंचायतीत प्राची प्रल्हाद घाडी २७४, शिरवली मध्ये भक्ती किशोर जठार १७७, फणसगाव ग्रामपंचायतीत सायली सुभाष कोकाटे ५५२, रामेश्वर ग्रामपंचायतीत विनोद विजयानंद सुके ३३७ मते मिळवून त्यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आहे.या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी जो पर्यंत या मतदार संघात शिवसेनेचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत कुणीही शिवसैनिक शांत बसणार नाही असे सांगत हा विजय सर्व जनतेचा आहे असे अस स्पष्ट केल. भाजपा शिरवली ग्रामपंचायतीचा आदर्शवत विकास करून दाखवू अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिलीय.

1 Comment

Click here to post a comment