ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जिंतूर तालुक्यात भाजपचा, तर सेलूत राष्ट्रवादीचा वर्चस्वाचा दावा

Gram Panchayat election result: BJP claims dominance in Jintur taluka, while NCP claims dominance in Selu

परभणी : जिंतूर तालुक्यातील 101 पैकी 74 ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये आपल्या समर्थकांनी मोठे यश मिळवल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केला आहे. दुसरीकडे, सेलू तालुक्यात राष्ट्रवादीने मोठे यश मिळवल्याचा दावा तालुकाध्यक्षांनी केल्याने भाजपच्या बोर्डीकर गटाने लगोलग प्रसिद्धिपत्रक दिले.

जिंतूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये आपल्या समर्थकांनी मोठे यश मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. 101 पैकी 74 ग्रामपंचायती ताब्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाविरुद्ध काही गावांत थेट लढती झाल्याचे बोर्डीकर गटाने म्हटले आहे.

तथापि, सेलू तालुक्यातही ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळविल्याचा दावा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ताठे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. या तालुक्यात माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या.

यात सावंगी, सिमनगव्हाण, गव्हा, बोरगाव, कान्हड शिराळा, चिखलठाणा बुद्रूक, राजुरा, पिंप्री गोडगे, सेलवाडी, रायपूर, तिडीपिंपळगाव, हादगाव पावडे, गिरवाडी काळे, ढेंगळी पिंपळगाव, करडगाव, जवळा शिवाजी, खेर्डा, खवणे पिंपरी, गुळखंड, कुंडी, काजळे रोहिणा, देऊळगाव गात, मोरेगाव, बोरगव्हाण, नागठाणा/कुंभारी, राजा, हातनूर, पिंपळगाव गोस्वावी, पार्डी, सोनवटी, नांदगाव, गिरगाव ताठे येथील ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविले आहे. दरम्यान, या तालुक्यातील खुपसा, निपाणी टाकळी, पिंपोळा, गोरेगाव, लाडनांदरा, कन्हेरवाडी, वाई आदी ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या