पैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला

पैठण ( किरण काळे पाटील ) – तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती   तहसीलदार महेश सावंत यांनी पत्रकारांना दिली .
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतसाठी होणा-या निवडणुकीसाठी  दि १५ सप्टेंबर पासुन नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यास प्रारंभ होणार असुन  २२ सप्टेंबर  अंतिम तारिख राहणार अाहे .तर अर्ज छानणी प्रक्रिया २५ रोजी होणार आहे .२७ सप्टेंबर अर्ज माघार  घेण्याची मुदत ठेवण्यात आली आहे .

७ ऑक्टोंबरला मतदान तर ९ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे .२२ ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण ४४ हजार ८६ मतदार आहे पैकी २३७४३ पुरूष तर २०३४३ महिला मतदार आहेत .या निवडणुक प्रक्रियेसाठी एकुण ८१ मतदान केंद्रे असणार असुन १२ निवडणुक निर्णय अधिकारी काम पाहणार आहेत.आचार संहिता प्रमुख म्हणुन गटविकास अधिकारी काम पाहणार  आहेत .२०६ सदस्य व २२ संरपंचपदाचे उमेदवार असे एकुण २२८ उमेदवार ७५ वार्डात सदस्य पदासाठी  नसिब अाजमावणार आहे .
यामध्ये आडूळ बु ,बिडकीन ,बोकुड जळगांव ,चिंचाळा ,देवगांव ,धनगांव ,धुपखेडा ,दिन्नापुर ,गेवराई बार्शी ,हिरापुर ,जांभळी ,कृष्णापुर ,मुधलवाडी ,नांदर ,नारायणगांव ,पोरगांव ,सालवडगांव ,शेकटा ,टाकळी पैठण ,तारू पिंपळवाडी ,वरवंडी खु व पुर्वी गेवराई या ग्रामपंचायत सह नव्यानेच पैठण तालुक्यात सामाविष्ठ करण्यात आलेल्या कुरण पिंप्री, ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची माहिती तहसिलदार महेश सांवत यांनी पत्रकार परिषदेत दिली .

राखीव जागेवरील उमेदवासाठी वैधता जातप्रमाणपत्र, व आवश्यक असणा-या कागपत्राची पुर्तता वेळेच्या आत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पहिल्यांदाच सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायतीच्या   निवडणुका  चुरशीच्या ठरणार आहे.