लातूर :- जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका निर्भय,शांत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आयोजित ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2020 आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, प्रभारी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे उपस्थित होते.या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, संपूर्ण लातूर जिल्हयात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता लागू आहे.
या निवडणूका निर्भय, शांत व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व विभागाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे असून या सर्व निवडणूक कार्यक्रमावर संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी नियंत्रण ठेवावे असे सूचित केले.जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबवत असताना कोरोना (कोवीड-19) च्या शासन निर्णयातील नियमांचे सर्व संबंधित विभागाने तंतोतंत पालन करुन कोरोना संसर्गापासून दूर रहावे. जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात वेळ अमावस्येचा सण येत असून या सणावेळी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी यावेळी दिल्या.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकाळात पोलिस विभागाने कायदा सुव्यवस्थे बाबत बंदोबस्त चोख ठेवून सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या बातम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबरसेलने दक्ष राहण्याच्या सूचना पोलिस विभागाना यावेळी दिल्या.जिल्हयात कोरोनाचा प्रादूर्भाव होत असल्याने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरसह योग्य त्या सुविधा संबंधित विभागाने निर्माण कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले.प्रारंभी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश महाडीक यांनी जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 बाबत संपूर्ण माहिती विषद केली. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी सुनील यादव ,अविनाश कांबळे, विकास माने, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !