ग्रामपंचायत निवडणूक 2021 : अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना दैनंदिन खर्च अपलोड करण्याची सुविधा

eci

लातूर :- स्थाजनिक स्ववराज्य संस्थांहच्याी निवडणुका लढविणा-या उमेवारांकरीता निवडणूक खर्चाचा हिशेब देण्याासाठी “वेळ (Time) आणि रित (Manner)” राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाअन्ववये निश्चीत केली आहे. त्यानुसार उमेदवाराने नामनिर्देशन भरल्या पासून ते निकाल लागेपर्यंत, केलेल्याच खर्चाचा दैनंदिन तपशील प्रत्येेक उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दुस-या दिवशी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

त्याचचप्रमाणे उमेदवाराने निवडणुकीचा निकाल लागल्यािनंतर खर्चाचा एकूण तपशील ३० दिवसांच्या आत तालुकास्तरावरील संबंधीत प्राधिकृत खर्च पथकास सादर करणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने वरील “वेळ व रित” प्रमाणे खर्चाचा तपशील सादरच केला नसेल किंवा उमेदवाराचा एकूण खर्च मर्यादेपेक्षा जास्त“ असेल किंवा “वेळ व रित” यांचे पालन झाले नसेल, तर महाराष्ट्रे ग्रामपंचायत अधिनियामाचे कलम १४-ब नुसार संबंधीत उमेदवारास अनर्ह करण्याबाबतची तरतूद आहे.

राज्य निवडणूक आयोगाव्दारे उमेदवारांच्यार व निवडणुकाशी संबधित अधिका-यांच्यां वापरासाठी True Voter App विकसित केले असून, सदर अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना दैनंदिन खर्च अपलोड करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. सदर अॅपच्याव माध्यमातून उमेदवारांना दैनंदिन खर्च अपलोड केलेली खर्चाची प्रिंट दुस-या दिवशी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत तहसील कार्यालयामध्ये प्राधिकृत खर्च पथकाकडे सादर करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे उमेदवाराने निवडणुकीचा निकाल लागल्याानंतर खर्चाचा एकूण तपशील ३० दिवसांच्याध आत तालुकास्तारावरील संबंधीत प्राधिकृत खर्च पथकास राज्यि निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यात नमुन्यांयमध्येध सादर करणे आवश्यक आहे.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ मधील सर्व संबधित उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी असे ही आदेशात नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या