fbpx

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

औरंगाबाद  : राज्य निवडणूक आयोगाचे ग्रामपंचायत, सार्वत्रिक निवडणूक-2017 चे संदर्भात घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमान्वये औरंगाबाद जिल्ह्यातील, सोयगांव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद व पैठण या तालुक्यातील एकूण 212 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.

त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गांवामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. व ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे ग्रामपंचायत निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम टप्पेनुसार (सर्व सदस्य व सरपंच पदासाठीचा कार्यक्रम) पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा 07-09-2017, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा 15.09.2017 ते 22.09.2017 वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 4-30 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा 25.09.2017 सोमवार वेळ सकाळी 11-00 वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दि. 27.09.2017 (बुधवार) दु. 3-00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा 27.09.2017 (बुधवार) दु. 3-00 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 7.10.2017 (शनिवार) स. 7-30 वा. पासून ते सायं 5-30 वा.पर्यंत.

मतमोजणीचा 09.10.2017 (सोमवार) (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिका-यांचा मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.), जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक11.10.2017 यांचा मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील,असे कळविण्यात आले आहे