पेंशन मिळेपर्यंत होणाऱ्या संघर्षात आघाडीवरच राहणार: पदवीधर आमदार सुधीर तांबे

जुनी पेंशन हक्क संघटनेचा निर्धार मेळावा संपन्न

भागवत दाभाडे / अहमदनगर,नेवासा – जुनी पेंशन हक्क संघटनेचा नेवासा शाखेचा तालुका निर्धार मेळावा संपन्न झाला आहे. यावेळी व्यासपीठावर शिक्षक आमदार सुधीर तांबे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, पंचायत समिती सभापती सुनीता ताई गडाख , विठ्ठलराव लंघे, गटशिक्षण अधिकारी साठे साहेब उपस्थित होते. माननीय तांबे साहेबांनी आपल्या हक्काची पेंशन लाभार्थी म्हणुन नाही तर हक्कार्थी म्हणुन घेण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि पेंशन मिळेपर्यंत आपण ही लढाई पुढे होवुन लढत राहु अशी ग्वाही दिली.

आमदार मुरकुटे म्हणाले, पेंशन मिळेपर्यंत पेंशन च्या प्रश्नाचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करत राहणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटनने केलेले आंदोलनाचे कौतुक केले. सोबत मुंडण आंदोलनाच्या चिकाटीला सलाम देखील केला. असेच लढत राहुन एक दिवस आपल्या हक्क्काची पेंशन आपल्याला मिळेल आणि त्यासाठी आपण वेळोवेळी विधानभवनात तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या मागण्या पोहोचवत असल्याची ग्वाही आमदार मुरकुटे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा परिषद पातळीवर कोणत्याही अडचणींचे निवारण करण्याचा शब्द दिला. पेंशन हक्क संघटनेचे कौतुक करत असतानाच फिनिक्स पक्षासारखी संघटनेने घेतलेली भरारी आणि त्यातुन निर्माण केलेल्या अस्तित्वाला माननीय नेवासा पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख यांनी शाबासकी दिली. या वेळी माननीय गटशिक्षणाधिकारी श्री साठे साहेब ह्यांचे मनोगत व्यक्त झाले. तालुकाध्यक्ष राजु ठोकळ यांनी पेंशन बाबतची तुलनात्मक परिस्थिती उपस्थितांसमोर ठेवुन विचार करायला भाग पाडावीत अशी उदाहरणे सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बाजीराव मोढवे सर होते.

You might also like
Comments
Loading...