Karnataka Election; तर दैवेगौडा होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही पक्षांकडून कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसून, कर्नाटक निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागणार आहेत. जर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरल्यास जेडीएस कर्नाटकाच्या सत्तेमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जेडीएसला आपल्या बाजूने घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

bagdure

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच दलित नेत्यासाठी आपण खुर्ची सोडायला तयार असल्याचे म्हटले होते. यावरुन विविध निष्कर्ष काढले जात आहेत. यावरुन असेही सांगण्यात येत आहे की, काँग्रेसलाही मॅजिक फिगर गाठण्याबाबत शंका आहे. त्याचबरोबर सिद्धरामय्या आणि जेडीएस प्रमुख दैवेगौडा यांच्यात मैत्रीपूर्ण राजकीय संबंध आहेत. त्यामुळे दैवेगौडांसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्याचे सूचक विधान सिद्धरामय्या यांनी केल्याची चर्चा आहे.

जर कर्नाटक निवडणुकीचे त्रिशंकू निकाल हाती आल्यास काँग्रेस जेडीएस प्रमुख दैवेगौडा यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन कर्नाटकमध्ये आपली सत्ता स्थापन करू शकते. अशा परिस्थितीमध्ये भाजपला मात्र सत्तेपासून दूर राहावे लागू शकते.

You might also like
Comments
Loading...