३१ डिसेंबरपर्यंत आधार लिंक करा अन्यथा……..

सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’ कार्ड काढण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने आता येत्या ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढविली आहे. केंद्र सरकारने याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. आधी ही मुदत ३० सप्टेंबर होती. ज्यांनी अजूनही ‘आधार’साठी अर्ज केलेला नाही त्यांना या वाढीव मुदतीत अर्ज करता येतील.

एकूण १३५ सरकारी योजनांसाठी ‘आधार’ सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, अजूनही बऱ्याच जणांकडे आधार कार्ड नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील बँकांनाही आता आपल्या ग्राहकांसाठी ‘आधार कार्ड‘ नोंदणी आणि ‘आधार’च्या तपशीलात बदल करण्याची सेवा द्यावी लागणार आहे. ३१ डिसेंबर २०१७पर्यंत जे बँकांचे ग्राहक आपले बँक खाते आधार कार्डशी जोडत नाहीत, त्यांची खाती या तारखेनंतर गोठवण्यात येणार आहेत.

 

 

 

You might also like
Comments
Loading...