अण्णांशी चर्चेसाठी गिरीश महाजन दिल्लीत

Anna Hazare

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. मात्र आज चौथ्या दिवशी सरकारला जाग आली असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचं शिष्टमंडळ अण्णांची भेट घेणार आहे.

Loading...

”कृषी राज्यमंत्री आणि गिरीश महाजनांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र कागदपत्र दाखवा, अशी अट त्यांना घातली. कागदपत्र घेऊन ते येणार होते. मात्र आले नाहीत. आज पुन्हा शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. काही ठोस निर्णय घेणार असाल तरच या,” असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं असल्याचं अण्णा म्हणाले.Loading…


Loading…

Loading...