शासनाने शेतक-यांपेक्षा कंपन्यांचे हित बघितले : पी. साईनाथ

blank

टीम महाराष्ट्र देशा : नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी पिकविम्याच्या नावाखाली शासन शेतक-यांची फसवणुक करीत आहे. एकंदरितच कार्पोरेट कंपन्यांचे भले करण्याचे धोरण असल्याचे परखड मत पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.मराठी पत्रकार परिषदेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी शनिवारी (१७) नांदेड येथे बोलत होते.

ते म्हणाले की, पंतप्रधान पिकविमा योजना फसवी आहे. यात शेतक-यांचे हित नाही. शासन सांगेल त्याच कंपनीचा विमा घ्यावा लागत आहे. त्यासाठी निवड नाहि. विशेष म्हणजे या कंपन्यांची कार्यालये त्या त्या जिल्ह्यात नाहित. त्यामुळेच विमा कंपन्यांचे हित जोपासणारी ही योजना आहे,हे स्पष्ट होते.