सर्व भरती परीक्षा फॉर्म आता फक्त ‘महापरीक्षा’ वेबपोर्टल वरच

www.mahapariksha.gov.in नवीन वेबपोर्टल १ ऑक्टोबर पासून सुरु

पुणे :- शैक्षणिक प्रवेश परीक्षा असो किंवा शासनाच्या विविध पदांच्या भरती परीक्षा प्रक्रिया आता या पुढे सर्वच परीक्षा एकाच वेबसाईट वर अप्लाई करण बंधनकारक केले आहे. www.mahapariksha.gov.in हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

या आधी प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळी वेबपोर्टल कार्यरत होती. परंतु त्यामुळे विद्यार्थयानची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असे आणि त्यामुळे विद्यार्थ्याना होणारा नाहक त्रास लक्षात घेऊन माहिती तंत्र शिक्षण विभागाने ‘महापरीक्षा’ हे एकच वेबपोर्टल बंधनकारक केले आहे. १ ऑक्टोबर पासून याची सुरुवात होणार आहे. या वेबपोर्टल च्या माध्यमातुन नोकरी विषयक माहिती, सर्व परीक्षाचे फॉर्म, परीक्षा शुल्क त्याचबरोबर परीक्षा घेणाऱ्या विभागात नोंदणी करणे, टाईमटेबल तयार करणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, हॉल टीकीट जाहिर करणे असे अनेक कामे आता एकाच वेब वर करता येतील. त्यामुळे विद्यार्थ्याना नाहक त्रास होणार नाही.