‘लसींच्या तुटवड्यावर राज्यसरकारला मिळाला परदेशातून लस आयात करण्याचा सल्ला’

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्या आरोपानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणाशी वाद घालायचा नाही वा मला कोणाला दोष देखील द्यायचा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे येथे आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात त्यामुळे त्या दिल्या जाव्यात इतकीच आमची मागणी असल्याच राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान स्क्रीनप्ले रायटर हरनीत सिंग या महिलेने ट्विटरवरुन महाराष्ट्राच्या परदेशातून लसींचा पुरवठा मागवण्यात यावा अशी विनंती केली. ‘मुख्यमंत्र्यांनी कृपया फायझर, मॉडर्ना, स्फुटनिक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सच्या लसी परदेशामधून मागवाव्यात. एक अधिक एक मोहिमेअंतर्गत लसीकरण तातडीने सुरु कारावं. म्हणजेच जे लसीचे पैसे देऊ शकतात त्यांनी स्वत: लस विकत घेत एका गरजूच्या लसीचेही पैसे द्यावेत. महाराष्ट्रातील लोकं नक्कीच तुम्हाला या साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी मदत करतील,’ असं ट्विट हरनीत यांनी केलं. ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनाही टॅग केलं आहे. त्यामुळे आता केंद्राकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :