गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला जमीन मंजूर

टीम महाराष्ट्र देशा: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी सीमर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे. गायकवाड पाठोपाठ तावडेला जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत कि, नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळवारी न्यायालयाकडून २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जून २०१६ पासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, पोलिसांना न्यायालयात त्याच्याविरोधात सबळ पुरावे सादर न करता आल्यामुळे अखेर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यामुळे पोलिसांच्या तपासाविषयी पुन्हा शंका उपस्थित झाल्या आहेत. जामीन मंजूर करताना न्यायालयाने वीरेंद्र तावडेला काही अटी घातल्या आहेत.

१.पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा
२.कोल्हापूरात जाण्यावर बंदी
३.साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये
४.दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी,