जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मंजुरी

Ramnath-kovind

श्रीनगर: राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात यावं, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. याला कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काळ (मंगळवार) महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.

‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा

मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

Loading...

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५

जम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी ?

Loading...