कर्करोगाशी संबंधित ‘कॉमा’ माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण 

टीम महाराष्ट्र देशा : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान वेळीच होणे गरजेचे असल्याने कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कर्करोगावर मात केलेल्या अलका भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘कॉमा’ माहितीपटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायन्स हॉस्पिटल डॉ.गुस्ताद डावर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेखा डावर, ‘कॉमा’ पुस्तकाच्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ, कॉमा माहितीपटाचे दिग्दर्शक आशिष निनगुरकर आदी उपस्थित होते.

Loading...

कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असून यावर त्वरित उपाययोजना झाल्यास काही बाबतीत नियंत्रण ठेवता येऊ शकते. स्वत: कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या लेखिका अलका भुजबळ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या ‘कॉमा’ या पुस्तकातून तसेच माहितीपटातून लोक प्रेरणा घेतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.  कॉमा पुस्तकाच्या प्रतीची भेट दिली असताना कोश्यारी म्हणाले, या पुस्तकामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे, या पुस्तकाचे हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे.

कर्करोगावर मात करत असताना मला कुटुंबाचा खूप मोठा आधार मिळाला. तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी मला प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. आपण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतो, त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. कर्करोगाला घाबरु नका तर त्यावर मात करा, असे भुजबळ म्हणाल्या. यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रेखा डावर म्हणाल्या, स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. चाळीशीनंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी ठराविक तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे.

अलका भुजबळ यांनी कर्करोगावर जी मात केली आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्करोगाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या श्रीमती भुजबळ स्वत: एक आदर्श आहेत. त्यांनी या माहितीपटामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा लढा कर्करोगग्रस्तांसाठी नव्हे तर इतरांसाठीदेखील प्रेरणादायी आहे, असा विश्वास पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.

समाजात कर्करोगाबद्दल जी भीती आहे, त्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कर्करोगावरसुद्धा मात करता येऊ शकते. त्याचे उदाहरण स्वत:  भुजबळ आपल्यासमोर आहेत. कर्करोगाशी सामना कशा प्रकारे केला जातो हे ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असल्याचेही पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

हेही नक्की पहा :

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार