शेतकऱ्यांना मदत वाढवून मिळण्यासाठी राज्यपालांना भेटणार : अजित पवार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : ”अवकाळी पावसानं राज्यातला शेतकरी मोडून पडला आहे. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनाही काही अडचणी असतात, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत अत्यंत तोकडी असून, अजून मदत वाढवून मिळावी यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचं आहे.” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ट्वीट करून दिली आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडविण्यासाठी महाशिव आघाडी निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, छगन भुजबळ आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

राज्यात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले, तसेच ‘अद्याप सत्तास्थापानेबाबत काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत या वावड्याच. आता सोनिया गांधी आणि पवार यांच्या भेटीनंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल.आता अवकाळीनंतर शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील. असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या