राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत वाढवून द्यावी – आमदार धीरज देशमुख

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत आला आहे. हातात आलेल्या पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात राज्यपालांनी या शेतकऱ्यांची जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.

मॉन्सूनमध्ये पावसाने दडी मारली आणि परतीच्या मॉन्सूनमध्ये अतिवृष्टी झाली. पावसाच्या यालहरीपणामुळे जे काही पीक आले होते, ते सर्व गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अवेळीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे.

खरीप पिकांसाठी आठ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे, परंतु ही मदत सर्वस्व हरवून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपुरी असून राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत वाढवून द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या