मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तातडीने विशेष बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. गुवाहटीतील हॉटेलमध्ये २०० खोल्या बुक केल्याचं ऐकलं आहे. चार्टर्ड फ्लाईटने हे आमदार रात्री फिरतात याची ईडी चौकशी का करत नाही? बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. याचीही चौकशी ED का करत नाही? असा सवालही नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
राज्यातील राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार असून जर बंडखोर आमदार मतदारांना धमकावत असतील तर हे फार गंभीर आहे. त्यावर त्वरीत कार्यवाही झाली पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज्यातील या सर्व राजकीय परिस्थितीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची होती. पण ते कशाची वाट बघत आहेत? विधानसभेत प्रक्रिया व्हायला पाहिजे. लोकशाहीचा खून करण्याचा केंद्राचा प्रयत्न होत आहे. राज्याचे तुकडे केंद्र सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- Narayan Rane : “युवराजांना अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अन…”; नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा बंडखोर नेत्यांना दणका, मंत्रीपदावरून केली हकलपट्टी
- Aaroh Welankar : “आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे…”, आरोहचे विधान चर्चेत
- Sanjay Raut ED Summons : “माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग…”, ईडी नोटीसीनंतर संजय राऊतांचे ट्वीट
- Sanjay Raut : बंडखोर आमदार मनसेच नाही, तर एमआयएममध्येही जाऊ शकतात; संजय राऊतांचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<